भाडोत्री गुंड पाठवून वकिलास मारहाण; मुंबईच्या पोलीस उपनिरीक्षकासह तिघे अटकेत

Foto

औरंगाबाद: पती-पत्नीत मुलाच्या ताबा वरून वाद सुरू होता मात्र पत्नीने चक्क भाडोत्री गुंड पाठवून पत्नीच्या नातलगांना मारहाण करीत मुलाचे अपहरण केल्याची धक्कादायक घटना शहरातील विद्यानगर भगात घडली. तीन जणांना अटक करण्यात आली आहे.विशेष म्हणजे या आरोपीमध्ये मुंबई येथे कार्यकरत असलेला एक पोलिस उपनिरीक्षकांचा समावेश आहे. दुपारपर्यंत मिळालेली माहिती अशी की, औरंगाबादेतील अ‍ॅड. वीर यांना एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन अपत्ये आहेत. मागील काही काळा पासून पती-पत्नी विभक्त राहत आहेत तर मुलगा वीर यांच्याकडे राहतो आणि मुलगी पत्नीकडे मुंबई येथे राहते. पाच वर्षीय मुलाच्या ताब्यावरून दोघात वाद होता.  

काल दुपारी वीर यांच्या निवासस्थानी मुंबई येथील ६ ते सात जण आले व वीर व नातलगांना बेदम मारहाण करीत पाच वर्षीय मुलाचे अपहरण केले. या प्रकरणी पुंडलीकनगर पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे या मध्ये मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेला उपनिरीक्षक अमोल चव्हाण चा समावेश आहे. या घटने प्रकरणी विविध  कलमा खाली पुंडलीकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती सहाय्यक निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी दिली आहे.